Maratha Arakshan News 2024
Maratha Arakshan News 2024 : महाराष्ट्र सरकारने आज सकाळी पहाटे मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आणि ही मराठा समाजासाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. या मध्ये जरांगे पाटलांचा मोलाचा हात होता त्यांचे उपोषण आणि त्या उपोषणामुळे सरकारला शेवटी मराठा समाजाच्या सर्व अटी मान्य कराव्या लागल्या.
यासाठी जरांगे पाटलांनी असंख्य मराठा आंदोलकांसह मुंबई गाठले आणि तेथे आपल्या मागण्या मांडल्या आणि त्या सरकारला पूर्ण कराव्या लागतील असेही त्यांनी सांगितले.
अध्यादेश स्वत: मुख्यमंत्री हे मनोज जरांगे पाटील यांच्या हाती देणार
Maratha Arakshan News 2024 सरकारचा अध्यादेश स्वत: मुख्यमंत्री हे मनोज जरांगे पाटील यांच्या हाती देणार आहेत आणि त्या नंतर मनोज जरांगे पाटील यांची रॅली ही निगणार आहे. मध्य रात्री मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सरकार ने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आणि आता आमचा कोणत्याच राजकीय पक्षाला विरोध नाही
मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारने या मागण्या केल्या पूर्ण वाचा
राज्यभरात जेवढयाही नोंदी झाल्या आहेत त्या सर्व परिवारांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. आता पर्यन्त ५४ लाख नाही तर ५७ लाख नोंदण्या मिळाल्या आहेत. त्यामधून आता पर्यन्त ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आम्हाला हा सर्व डेटा हवा आहे अशी मागणी जरांगे पाटील यांची होती आणि ती मागणी सारकाने मान्य केली आहे.
कुणबी नोंद साठी शपथपत्र मागणी/Maratha Arakshan News 2024
ज्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांकडे कुणबीची नोंद नाही त्यांनी शपथपत्र तयार करून द्यायचे आहे. त्या शपथपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र देणार आहे. हे शपथ पत्र १०० रु आहे. पण तेही मोफत देण्याचे मान्य केले आहे
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी
जरांगे पाटलांच्या मागण्यामधील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या आणि त्यांना गृहविभागाचे पत्र द्या मागणी करण्यात आली आहे. तीही मागणी पूर्ण करण्यात आली आहे
आरक्षण मिळेपर्यंत मोफत शिक्षण
कयूरेटीव पिटिशन चा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे ते आरक्षण मिळते तोपर्यंत मराठा समाजातील सर्वांना मोफत शिक्षण द्यावे ही मागणी मनोज जरांगे पाटील यांची मान्य झाली आहे